"जिन्दगी हर कदम इक नयी जंग है.
जीत जायेंगे हम, तू अगर संग है.. "हे गाणे गेले तीन-चार महिन्या पासून फार आवडू लागले आहे. आधी ऑस्ट्रेलिया ४-०, नंतर चँपियन्स ट्रॉफी मधील संघर्षपूर्ण टायटल, आणि लगेच वेस्ट-इंडिजमध्ये सुस्त सुरवाती नंतर स्पीड वाढ्वून शेवट्च्या मिनिटाला जिंकलेली रेस, किमान आंतराष्ट्रीय मॅचेस मध्ये भारतीय संघाचे सुगीचे दिवस चालू आहेत.
विजिगीषु प्रव्रुत्ती, जी जास्त काळ आपल्या टिम सोबत राहत नाही, ती बराच काळ सोबत राहिली, बर्याच जणांना जवाबदारी हा शब्द कळालेला दिसला, स्टार रवींद्र जडेजा प्रती रजनीकांत सहकलाकाराच्या भुमिकेतुन लीड कॅरेक्टर कडे झेपावतोय.
खुदी को कर बुलंद इतना के, खुदा भी तुझसे पुछे , बता धोनी तेरी रजा क्या है? ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या द्विशतकानंतर धोनीने स्वतःला नक्कीच एवढे बुलंद केले आहे की सध्यातरी
त्याची प्रत्येक रजा मंजूर होत आहे. २०११ च्या इंग्लंड दौर्या मधे मागे लागलेली साडे साती अनेक खड्तर कष्ट देऊन गेली पण, ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यानंतर धोनीने ती उजवुन टाकली.
धोनी च्या लक आणि लुक बदद्ल नेहमीच चर्चा होत असते. जेवढ्या लवकर त्याचे लक बदलत नाही, त्या पेक्षा लवकर त्याचे लुक बदलत असते. केसाळ, ट्रिम, चमन, आणि आता सिकंदरच्या शिरस्त्राणा सारखे. असो , असते काही जणांना आवड.
इकडे ऑस्ट्रेलिया बिचारी जमेल त्या खेळाडूला चान्स देऊन चांगल्या खेळाडूंचा मटका लागतोय का हे आजमावतेय. ऑस्ट्रेलियाचा खेळ चांगला होतोय पण, साला रिजल्ट भेटत नाहीए. नाही म्हणायला इंग्लंड विरुद्धची सिरीज पदरात पाडुन घेतली. पण, धाकट यश मिळत नाहीए, त्यात आणि टिम-मधला विस्कळितपणा, वादग्रस्त वर्तणूक यामुळे टिम ची फरफट आणखी वाढली आहे.
टेस्ट सिरीज-नंतर फिरुन ऑस्ट्रेलिया वन-डे खेळायला आली आहे. खेळण्यातला तिखटपणा जरी कमी झाला असला तरी, आक्रमकता आणि लढाऊ बाणा टिकून आहे.
शस्त्रातील धार जरी कमी झाली असली तरी , वार करण्या ची ताकत कमी झालेली नाही/ टिकून आहे. " This too shall pass " या आशेवरती ऑस्ट्रेलिया परत एकदा वॉर्नर, वॅटसन् ,स्मिथ, हॅडिन, फिन्च यांच्यावर भिस्त ठेवून मैदानात उतरेल. बॉलिंगचा नेहमी सारखा ३-१-२ असा फॉर्मुला ठेवेल. ( ३-फास्ट, १-स्पीन, २-ऑल-राउंडर). पण आता बॉलिंग किती जरी चांगली असली तरी, "इंडियन विकेट" ऑस्ट्रेलियन बॉलर्स साठी दिव्यच असेल. टॉस जिंकून धावांचा रतीब रचणे आणि नंतर बॅटसमन वर प्रेशर आणने हीच स्ट्रॅटेजी त्यांना जास्त लाभदायक ठरेल असे वाटते ..
इकडे धोनी आणि कंपनी हॅप्पी-गो- लकी या मूडमध्ये आहे. हात घालू तिकडे सोनं मिळतय. त्यामुळे जास्त टेन्शन नाही. फॅन्स सुद्धा रिलॅक्स मुड मध्ये मॅचेस एंजॉय करतील, आणि, थोडं टेंशन आलंच तर हे गाणं आहेच..
"जिन्दगी, हर कदम, इक नयी जंग है.
जीत जायेंगे हम, तू अगर संग है.."
Ritesh Kadam
9011020015.
No comments:
Post a Comment