“द शो मस्ट गो ऑन!” (खरंच?)
सध्या देशात दोन आय.पी.एल. गाजताहेत, एक इंडियन पॉलिटिकल लीग, आणि दुसरी इंडियन प्रिमियर लीग. पण माहोल मात्र पहिली गाजवत आहे, इंडियन पॉलिटिकल लिग. टि.आर.पी. आणि जाहिरातींमधेसुद्धा आय.पी.एल. बरंच मागं पडलंय. असो, मुख्य मुद्दा तो नाहिये. सालाबादप्रमाणे यावर्षीही आय.पी.एल.ची जत्रा ठरल्या वेळेप्रमाणे भरणार आहे. एकविरा आईच्या कृपेने काही दिवसांपूर्वी आलेले 'ते' संकट पार पडले आहे. जाहिरातदारांनीही आपापले स्टॉल सजवून जय्यत तयारी केली आहे. हां, थोडासा प्रॉब्लेम आहे तो विलेक्शनमुळे. तेंव्हा संयोजकांच्या या अडचणींमुळे आय.पी.एल.ची जत्रा यावर्षी शेजारच्या गावात सुरु होईल, काही दिवस तिथे मनोरंजन करेल आणि इथला इलेक्शनचा फड संपला, की परत आपल्या गावात हजर होईल; पण काळजी नसावी. या जत्रेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे, क्रिकेटच्या गावकर्यांनी थोडे दिवस त्रास सहन करुन सहकार्य करावे.
आता 'त्या' संकटाबद्दल. काय तर म्हणे, आय.पी.एल.च्या मॅचेस फिक्स असतात. नाही, मुदगुल समितीने असा अहवाल सादर केला आहे. श्रीनिवासन, दारासिंग, मय्यपन, सोबत रैना, आणि आय.पी.एल.चे दैवत धोनी यांचे बुकिंसोबत थोडे संबंध आहेत. आणि त्यामुळे आय.पी.एल.मधे काहीतरी काळं-बेरं होत असतं. लोकांना बघवत नाही हो, आय.पी.एल.चे यश. काही झालं तरी हा बिजनेस आहे. थोड्या विघातक शक्ती त्यात विघ्नं आणण्याचा प्रयत्न करणारच. आपण त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही. कारण, आम्हाला नशा चढली आहे, या जत्रेची, सामन्यांची, जत्रेतील मिरवणुकीची. झिंग चढली आहे, या लुटुपुटुच्या लढायांची. मालकांचा संघ आणि मालक म्हणतील त्याप्रमाणे अंमलबजावणी; प्रेक्षकांचे मनोरंजन होते ना, मग एखादा नो-बॉल, एखादी विकेट मुद्दाम टाकली, तर एवढा काय गहजब! संघातील माहिती बुकिला दिली, त्यात गुन्हा तो काय?
थोडी फार सारवा-सारव होईल आणि परत त्याच दिमाखात जत्रा चालू राहिल. तेच संगीत, तीच चमक, तोच उत्साह आणि, परत तीच नशा... कारण "शो मस्ट गो ऑन!", नाही का?

No comments:
Post a Comment