दक्षिण आफ्रिकेत दोन गोष्टींचं पीक मुबलक प्रमाणात येतं. एक, अप्रतिम हिरे आणि दुसरं म्हणजे अजोड असे ऑल-राउंडर क्रिकेटर! १९९१ साली क्रिकेट जगतात री-एंट्री झाल्यानंतर कदाचित आफ्रिकेनंच सर्वात जास्त हिर्यासारखे ऑल-राउंडर क्रिकेट जगताला दिले आहेत - मॅकमिलन, पोलॉक, क्लुसनर, क्रोनिए, आणि कॅलिस. पैकी कॅलिस हा पैलू पाडलेला चोविस कॅरेटचा लखलखता हिरा होता. संपूर्ण करियरमधे या हिर्याची चमक सतत तेजःपुंजच राहिली.
१९९५-९६ साली सोनेरी केस असलेल्या या स्टाइलिश खेळाडूनं करियरला सुरुवात केली. आफ्रिकेच्या संघाचा दबदबा त्याकाळी नुकताच चालू झाला होता. आपल्या इथं बॉलरनं जरा चांगली बॅटींग केली, की लगेच घिसाडघाई होते त्याला ऑल-राउंडरचा शिक्का मारण्यासाठी. पण जातिवंत ऑल-राउंडर होणं किंवा असणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. त्याला क्रिकेट देवाचा आशिर्वाद घेऊनच जन्मावं लागतं.
क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं, तर ऑल-राउंडरमधे प्रकार दोन - बॉलिंग ऑल-राउंडर आणि बॅटिंग ऑल-राउंडर.
म्हणजे बेसिक स्किल हे बॉलिंग पण सोबत बॅटिंगही जमते, तो बॉलिंग ऑल-राउंडर. इम्रान खान, वसिम अक्रम, शॉन पोलॉक, कपिल देव, हॅडली हे बॉलिंग ऑल-राउंडर या कॅटेगरीमधले.तर दुसर्या प्रकारात पिंड बॅटिंगचा, पण बॉलिंग टाकता येते, तो बॅटिंग ऑल-राउंडर. हंसी क्रोनिये, स्टिव्ह वॉ, क्लाइव्ह लॉइड, रवी शास्त्री, क्लुसनर हे बॅटिंग ऑल-राउंडर या कॅटेगरीतले. पण या दोन्ही प्रकारात कुठली तरी एक बाजू दुर्लक्षित राहते.
तर या दोन्ही प्रकारामधे जे पारंगत असतात, निष्णात असतात, त्यांना बॅटलिंग ऑल-राउंडर अशी संज्ञा दिली, तर ती वावगी ठरू नये.क्रिकेट इतिहासात फार कमी प्लेयर्स या कॅटेगरीमधे सातत्य ठेवू शकले. सर गॅरी सोबर्स, बोथम, आणि कॅलिस हे या कॅटेगिरीमधले मोजके नामवंत.
क्रिकेटमधे बॉलर आणि बॅट्समन यांची सांगड घालून परफेक्ट-११ची टीम तयार करणं, हे महाकठीण काम. अशा वेळी कॅलिससारखे ऑल-राउंडर देवासारखे धावून येतात.
कॅलिस बॅटिंगच्या बाबतीत टेक्निकली एकदम परफेक्ट. फॉरवर्ड डिफेन्स, बॅकफूट ड्राइव्ह, कव्हर-ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, फ्लिक... सर्व शॉट पुस्तकात दिल्याप्रमाणं अगदी काटेकोर. शॉट खेळताना त्याचा बॅलन्स कधीही ढळला नाही.
तसं बघितलं तर ऑल-राउंडर म्हणजे फक्त बॅटिंग-एके-बॅटिंग किंवा वाटेला आलेल्या ओव्हर टाकणे नव्हे. संघाचा तो आधार असतो. पाच किंवा सहा नंबरवर येऊन तो टीमच्या स्कोअरमधे नाही म्हटलं तरी चाळीस-पन्नासची भर घालतो. कॅलीसनं अशा बर्याच वेळा आफ्रिकेला संकटातून बाहेर काढलं आहे. २०११ सालची भारत-आफ्रिका टेस्ट आठवते? आपल्याकडं दीडएकशे रन्सची आघाडी होती. कॅलिस जखमी, आफ्रिका १३० वर सहा विकेट. आपण मालिका जिंकणार, हे जवळपास निश्चित! पण कॅलिस आला, मॉर्कलला सोबत घेऊन सेंन्चुरी मारली, आणि आफ्रिकेला फक्त सामन्याच्याच नव्हे तर मालिका पराभवाच्या संकाटातूनही वाचवलं. अशा अनेक संस्मरणीय खेळी कॅलिसनं खेळल्या आहेत. कॅलिस या नावाचा धाक प्रतिस्पर्धी संघात नेहमी असायचा... कॅलिसमधल्या बॉलरनंही बॅटिंगप्रमाणंच तगडा परफॉर्मन्स दिला होता. उमेदीच्या काळात १४० ते १४५ या स्पीडनं तो बॉलिंग टाकायचा. इतकंच नव्हे, तर कॅलिस हा एक उत्कृष्ट असा स्लीप-फिल्डरही होता. आपण सचिनबद्दल बोलतो, लाराबद्दल बोलतो, पाँटींगची स्तुती करतो; पण कॅलिसही त्यांच्याच तोडीचा होता. मित्रांनो, कसोटी आणि वन-डेमधे दहा हजारापेक्षा जास्त रन्स, तीनशेपर्यंत विकेट्स, आणि दोनशे कॅचेस! खरंच, कॅलिस एक लिजंड होता... किंबहुना 'चोविस कॅरेट हिरा' ही उपमाच त्याच्यासाठी योग्य ठरेल!