राजकारण आणि स्पोर्ट्स, ही दोन अशी क्षेत्रं आहेत जिथं 'कॉन्ट्रावर्सी' हा अविभाज्य घटक असतो. तिथं कॉन्ट्रावर्सी नसणं हीच मोठी कॉन्ट्रावर्सी असू शकते. सध्या अशीच एक 'कॉन्ट्रावर्सी' गाजतेय क्रिकेटमधे, सचिनच्या आत्मचरित्रावरून. सचिन नावाच्या महापराक्रमी योद्ध्यानं क्रिकेट कारकीर्दीमधले आपले अनुभव - बरे आणि वाईट, स्वतःच्या आत्मचरित्रात उतरवले. सचिनची क्रिकेटमधील तेवीस वर्षांची कारकीर्द, तीही भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात! त्यामुळं त्याचं आत्मचरित्र हे त्याच्या बॅटिंगसारखंच खणखणीत असणार, यात काही शंका नव्हती. पण वादविवादापासून नेहमीच दूर राहणार्या सचिननं ग्रेग चॅपल नावाचं एक 'वादग्रस्त चॅप्टर' त्यात टाकून वादळ निर्माण केलं. या चॅप्टरमधे चॅपलचा 'चाप्टरपणा', त्याची फुटीरतावादी वर्तणुक, आणि त्याची कार्यशैली कशी संशयी होती, हे सचिननं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. अनेकांना हे खटकलं. पण सचिन काही पहिला खेळाडू नाही ज्यानं आपल्या पुस्तकात कटू, पण सत्य अनुभव कथन केले आहेत. हसी, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न, आणि झालंच तर शोएब अख्तर, पिटर्सन या सर्वांनीच या ना त्या प्रकारे असे अनुभव मांडले आहेत. बरं, सचिननं जर एखादा अनुभव सांगितला असेल आणि तोही पुस्तकाद्वारे, तर त्याच्या क्रेडिबिलिटीवर शंका घेण्याचं काहीच कारण नाही. त्याच्या शॉटप्रमाणेच त्याचे विचारही 'क्लिन' असतात. भले ग्रेग चॅपलनं या आरोपांचा साळसूदपणे इन्कार केला असेल, पण चॅपेल किती विश्वासार्ह आणि (अव)गुणी आहे, हे ऑस्ट्रेलियासकट सर्वांना माहित आहेच!
काहींनी शंका उपस्थित केली की, हा वाद-प्रपंच आत्ताच का? या गोष्टी आधी का नाही सांगितल्या? पुस्तक खपवायचं हे 'मार्केटिंग' आहे का? वगैरे, वगैरे. एक तर सचिनला असल्या 'चीप' मार्केटिंगची गरज नाही. दुसरं म्हणजे क्रिकेटमधे काही एटिकेट्स बाळगायचे असतात. क्रिकेट खेळत असताना अशा 'गुज-गोष्टींची' वाच्यता ड्रेसिंग-रुमच्या बाहेर करायची नसते. त्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात. जेवढं शक्य आहे तेवढं वादळ कपातच शांत ठेवायचं असतं. नाही तर टीम आणि खेळाडूची कारकीर्द विस्कटायला वेळ लागत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इंग्लंडचा केविन पिटर्सन, आपला मनोज प्रभाकर, आणि सिद्धू!
क्रिकेट खेळणं हे लढाईसारखंच असतं. लढाई लढताना, जिंकताना, हरताना जितके वार केले जातात तितकेच, किंबहुना जास्तच झेलावेही लागतात. त्या जखमांच्या खाणाखुणा शरीरासोबत मनावरही उमटत असतात. सतत मैदान गाजवत असताना मनावरील या जखमा, कटू आणि वेदनादायक अनुभव खोल कुठंतरी दबून राहतात, नव्हे ते दाबून ठेवावे लागतात. पण शस्त्रं खाली ठेवल्यानंतर मनातल्या या जखमांचा भार, ते अनुभव कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर येतातच! सचिननं तो भार 'प्लेइंग इट माय वे' द्वारे शब्दरुपानं पानांवर उतरवला इतकंच.

No comments:
Post a Comment